प्रेम आपुलकी मेळावा
आमच्या शाळेचा जिव्हाळा
आमची संस्था नर्मदेश्वर
बहुउद्देशीय सेवाभावी उत्कर्ष मंडळ संचलित मतिमंद निवासी विद्यालय, चाळीसगाव २००७
पासून चाळीसगाव शहगाच्या इतिहासात समाजापासून दुर्लक्षीत झालेल्या मतिमंद
मुलांच्या समस्या लक्षात घेऊन उदयास आली. गेल्या १० वर्षापासून विना अनुदान तत्वावर
शाळा ४० विद्यार्थ्यांची देखभाल करीत आहे. आज या बालकाची काळजी घेणे, जेवण, विविध
वैद्यकीय चाचण्या, शैक्षणिक साहीत्य, गणवेश, अंथरुण व इतर खर्च, शिवाय जीवापाड या
विद्यार्थ्यांवर प्रेम करणारा, आपुलकी दाखवणारा आमचा शिक्षक व कर्मचारी वर्ग या
सर्वांचा खर्च म्हणजे एक तारेवरची कसरतच म्हणावी लागेल.