दानशूर व्यक्ती
१५ डिसेंबर २०२२ - मामाची ऑटो पार्ट चे संचालक श्री. पवन चोपडा यांच्याकडून मतिमंद निवासी विद्यालयातील मुलांना कपडे वाटप करण्यात आले त्यावेळेस संस्थाध्यक्ष श्रीहेमंत पाटील मुख्याध्यापिका सौ विजयालक्ष्मी सूर्यवंशी मॅडम व शिक्षक शिक्षक उत्तर कर्मचारी उपस्थित होते.
-----
शहरातील व शहराबाहेरील दानशूर व्यक्ती
विद्यालयाला भेटी देऊन विद्यालयातील विद्यार्थ्यांना अल्पउपहार, भोजन देऊन
विद्यार्थ्यांच्या चेह-यावर हसू फुलवतात. अशा दानशूर व्यक्तींचे आम्ही नेहमी
उपकारी राहू.
जनतेला आवाहन –
माणूस हा समाजशील
प्राणी आहे यासाठी प्रत्येक मानवाला अन्न – वस्त्र – निवारा या मुलभूत गोष्टी
मिळाच्याच पाहीजे यासाठी गरज आहे आपल्या सारख्या दानशूर समाजसेवकांची, त्यासाठी आपण आमच्या कार्यास
आर्थिक हातभार लावून खारीचा वाटा उचलावा व या मतिमंद बालकांना त्याच्या गरजा पुर्ण
करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन देणे हीच खरी मानवतेची हाक.
![]() |
| विद्यार्थ्यांना ड्रेस वाटप करतांना |
![]() |
| वाढदिवसानिमित्ताने विद्यार्थ्यांना सोनपापडी वाटप |
![]() | |
|
डॉ. प्रशांत एरंडे (ग्रामपंचायत सदस्य खरजई) यांच्या वाढदिवस निमित्त विद्यालयात अन्नदान करण्यात आले. यावेळी युवा मोर्च्याचे सर्व पदाधिकारी व कार्यकारी उपस्थित होते.
----------
श्री. पियुष कटारिया यांच्या वाढदिवसाच्या निमिताने विद्यालयात जेवन देताना करारिया परिवार.
------------
दि. १४ जानेवारी २०१७ रोजी विद्यालयात वाढदिवसानिमित्त भोजन देतांना डॉ. सौ. चव्हाण
------------
दि. ११ फेब्रुवारी २०१७ रोजी रोटे. श्री. भारत पाटील सर यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ विद्यालयात जेवण वाटप व सोबत विद्यालयास १० लिटर चा कुकर दिला.
------------
दि. ०९ सप्टेंबर २०१७ रोजी सौ व श्री. अभिमन्यु बोराडे यांनी त्यांच्या नातवाच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयातील विद्यार्थ्यांना भोजन वातप केले.
------------
🙏🏻मतिमंद निवासी विद्यालय🙏🏻
मु.पो.तालुका- चाळीसगांव, जिल्हा- जळगांव
२८ मे २०२१, शुक्रवार
पाहायला गेल्यास बहुतेक प्रत्येकजण आपल्या आयुष्यतला विशेष दिवस हा आपल्या मित्र, परिवार व नातेवाईक यांसोबत साजरा करत असतात
पण आज आपल्या मतिमंद निवासी विद्यालयात एक खास व्यक्ती त्यांचे वडील यांचा वाढदिवस अगदी आनंदात साजरा केला.
श्री. निरंजनसिंग नैनसिंग राजपूत, (वैद्यकीय शिक्षण विद्यार्थी )
आपल्या वडीलांच्या वाढदिवसानिम्मित त्याच्या मित्रांन सोबत विद्यालयास भेट दिली. त्यांनी शाळेच्या विशेष विद्यार्थ्यांन विषयी कोवीड काळात घरी काय करत आहे विषयी माहिती जाणून घेतली व विद्यार्थ्यांना घरी लागणारे शैक्षणिक साहित्य दिले!
आमच्या या सामाजिक कार्यात हातभार लावून त्यांनी विद्यालयाच्या विशेष विद्यार्थ्यांना 'एक मोलाची' आठवण म्हणून भेट दिली याबद्दल संपूर्ण विद्यालयातील परिवार यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि त्यांच्या वडीलांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो!
"आम्ही झालो पालक।
तुम्ही ही व्हा ना नातेवाईक।।"
#Share & Care
आमच्या या समाजकार्याबद्दल अधिक माहिती साठी कृपया मतिमंद निवासी विद्यालयाच्या Website ला भेट द्यावे
आपला एक समाजसेवक
संस्थापक/अध्यक्ष
श्री. हेमंत पाटील. 9881260170
मुख्याध्यापक.
श्री. पंकज बळीराम सर,
7620137386
---------------------------














